कोल्हापूर काँग्रेसकडून तालुकाध्यक्षांची घोषणा Kolhapur Congress announces Taluka Presidents

 कोल्हापूर काँग्रेसकडून तालुकाध्यक्षांची घोषणा


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवे तालुकाध्यक्ष जाहीर केले.करवीर तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण पाटील, शिरोळ तालुकाध्यक्षपदी दरगु गावडे, पन्हाळा तालुकाध्यक्षपदी श्रीनिवास पाटील, तर कागल तालुकाध्यक्षपदी ॲड. दयानंद पाटील-नंद्याळकर यांची निवड करण्यात आली.Kolhapur Congress announces Taluka Presidents

कोल्हापूर जिल्हा औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अनुप आनंदराव पाटील, तसेच महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल महादेव पाटील यांचीही निवड करण्यात आली.
 या निवडींना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू छत्रपती, आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील यांची मान्यता मिळाली आहे.रामकृष्ण पाटील हे वरगणे ग्रामपंचायत सदस्य व हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन आहेत. दरगु गावडे हे शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. श्रीनिवास पाटील हे यशवंत सहकारी बँकेचे माजी संचालक तर ॲड. दयानंद पाटील-नंद्याळकर हे मंडलिक कारखान्याचे  संस्थापक-संचालक आणि सरपंच परिषदेचे माजी जिल्हा समन्वयक आहेत.


काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सांगितले की, “काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष पुन्हा एकदा जिल्ह्यात बळकट करण्याचा संकल्प या निवडींद्वारे केला आहे.”



Post a Comment

Previous Post Next Post