स्कुटीवरून गांजा वाहतूक करणारा युवक अटक — 330 grams of ganja and valuables worth Rs 28,000 seized. Local Crime Investigation Branch takes drastic action

कोल्हापूर : जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तीव्र मोहीम राबवली जात आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत स्कुटीवरून गांजा विक्रीसाठी येणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. शरद मारूती परबंकर (वय ३६, रा. मळगे बुद्रुक) या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३३० ग्रॅम गांजा (किंमत ₹८,२५०), मोबाईल हॅण्डसेट आणि सुझुकी लेट्स मॉडेल स्कुटी असा एकूण ₹२८,२५० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १४ नोव्हेंबर रोजी कागल–निढोरी रोडवरील भैरवनाथ मंदिराजवळ करण्यात आली.

330 grams of ganja and valuables worth Rs 28,000 seized. Local Crime Investigation Branch takes drastic action

पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी करे, पीएसआय जालिंदर जाधव आणि अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, अशोक पवार, विजय इंगळे, गजानन गुरव, हंबीरराव अतिग्रे, प्रशांत गोजारे, संदीप ढेकळे, बजरंग पाटील व रूपशे पाटील यांनी संयुक्तरीत्या या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणी आरोपीवर अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post