कोल्हापूर:प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्र. 1 यांनी पेठ-वडगाव (ता. हातकणंगले) येथील पन्हाळकर वसाहतीतील घरावर केलेल्या कारवाईत जवळपास रु. 6,97,419/- किमतीचा विनापरवाना बनावट मद्यसाठा तसेच अवैध मद्यार्क जप्त करण्यात आला. याप्रकरणी रणजित प्रकाश कांबळे (वय 40, रा. पन्हाळकर वसाहत) यास अटक करण्यात आली आहे.
भरारी पथकास मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, संशयित इसम महाराष्ट्रातच विक्रीस परवानगी असलेल्या रिकाम्या मद्याच्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरून त्याची अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.50 वाजता छापा टाकण्यात आला.
6.97 लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : एक जण अटकेत
छाप्यात आरोपी आपल्या घरात अवैध मद्यार्क (स्पिरीट), विविध ब्रँडचे रिकामे बाटल्या, बनावटरीत्या सिलबंद केलेल्या बाटल्या, मद्य इसेंस, कॅरेमल, बुचे, प्लॅस्टिकचे गाळणे, मोजणीचे मग, हायड्रोमीटर अशा साहित्याचा वापर करून बनावट मद्य भरत असल्याचे आढळून आले. तसेच वापरातील वाहनासह सर्व साहित्य जप्त करण्यात आले.सदर गुन्ह्यात इतर साथीदारांचा सहभाग आहे का? बनावट मद्य कोठे पुरवठा केले जात होते? अवैध स्पिरीटचा पुरवठादार कोण? याबाबतचा तपास सुरू असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती निरीक्षक सदानंद मस्करे यांनी दिली.मा. आयुक्त श्री. राजेश देशमुख, मा. संचालक (दक्षता व अंमलबजावणी) श्री. प्रसाद सुर्वे तसेच मा. विभागीय उपआयुक्त श्री. विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये आणि कोल्हापूरचे मा. जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व मा. उपअधीक्षक श्री. युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे, अभयकुमार साबळे, स.दु.नि. कांचन सरगर, तसेच जवान विलास पोवार, सचिन लोंढे, धीरज पांढरे, विशाल भोई, प्रसाद माळी व वाहनचालक साजीद मुल्ला यांनी सहभाग घेतला.या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे हे करीत आहेत.
Post a Comment