कोल्हापूर : नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेले गोव्यात विक्रीसाठीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण १८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.या संदर्भात प्रविण सतिश गायकवाड (वय 33, मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर), योगेश जनार्धन मस्कर (वय 21, अत्याळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आणि अनंत अरुण मेस्त्री (वय 33, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या तिघांना अटक करण्यात आली असून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने डॉ. राजेश देशमुख (मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), श्री. प्रसाद सुर्वे (सहआयुक्त, दक्षता व अंमलबजावणी) आणि विजय चिंचाळकर (विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), बांदा व आंबोली (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकण्यात आले. यावेळी टोयोटा कंपनीची इटॉस (क्र. MH14 FS 3323), टाटा कंपनीची गोल्ड इंट्रा पिकअप (क्र. MH07 AJ 4472) व मारुती सुझुकीची स्विफ्ट (क्र. MH04 EF 7758) या वाहनांमधून विदेशी दारूचे एकूण 70 बॉक्स सापडले.गोवा निर्मित विदेशी मद्याची अंदाजे किंमत रु. 6,48,000/- तर जप्त वाहनांची किंमत रु. 12,20,000/- असून एकूण रु. 18,68,000/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, आर. एम. पाटील, एस. पी. डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, तसेच कर्मचारी मारूती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, योगेश शेलार, राहुल कुटे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास निरीक्षक किरण पवार आणि दुय्यम निरीक्षकांची टीम करीत आहे.

Post a Comment