कौलगे येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला. illegal Goa liquor Transport

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या गडहिंग्लज पथकाने पाच लाख 69 हजार 880 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्य साठा वाहनासह पकडला आहे. याप्रकरणी महादेव पांडुरंग साळुंके ( वय ४४ रा.अंजनगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर ) शंकर तात्याबा वगरे ( वय ४३ रा. मालवंडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, आणि दादासाहेब गोरख वाघमोडे ( वय ३९ रा. अंजनगाव, ता.बार्शी,जिल्हा सोलापूर ) या संशयीतांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे फाटा येथे रविवारी करण्यात आली. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.


या प्रकरणी अधिक माहिती अशी की गोव्याहून गोवा बनावटीचा मद्यसाठा एका पिकउप वाहनातून गडहिंग्लज आजरा मार्गे येणार असल्याची माहिती गडहिंग्लज विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात गस्त सुरू केली. रविवारी पहाटेच्या दरम्यान एक संशयित बोलेरो येताना दिसली. तपासणी मध्ये प्रथम दर्शनी गाडीच्या हौदामध्ये टिशू पेपर चे दोन मोठे रोल आढळून आले. टेम्पोची अधिक तपासणी केली असता पत्र्याचे गोपनीय कप्पा केल्याचे दिसून आलं. त्यामध्ये विविध ब्रँडचा गोवा बनावटीचा मद्य साठा आढळून आला. त्यानुसार याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील महादेव पांडुरंग साळुंखे, शंकर तात्यापा वगरे, दादासाहेब गोरख वाघमोडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर अध्यक्ष स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय शिंलेवंत, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, सत्यवान भगत,नरेश. करेकर, जवान देवेंद्र पाटील, आशिष पवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ,यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post