विद्यार्थ्यांचे मोबाईल व कास्ट आयर्न चोरणाऱ्या दोघां चोरट्यांना अटक. thief's Arrested

विद्यार्थ्यांचे मोबाईल व महापालिकेची कास्ट आयटी सेक्शन ची पाईप चोरी करणाऱ्या दोन आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. विजय सतीश कांबळे रा. शिरोली पुलाची, आणि अक्षय श्रीकांत गाडीवडर रा. दौलत नगर अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अशी माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली आहे. टाकाळा येथील अनुकामिनी मंदिर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

त्या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, फौजदार समीर शेख, कॉन्स्टेबल संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडे, सत्यजित सावंत, सुशांत तळप यांनी सहभाग घेतला

Post a Comment

Previous Post Next Post