काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारार्थ सहभाग.MLA Satej Patil participated in the campaign in connection with the Hatkanangle Nagar Panchayat elections.

 हातकणंगले ; प्रतिनिधी 

   काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचारार्थ सहभाग घेतला  .कष्टकरी तसेच सामान्य माणसांच्या समस्या आणि वेदना जाणून घेणारा नगराध्यक्ष हातकणंगलेच्या नगराध्यक्षपदी असावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. आपले दैनंदिन प्रश्न अस्थिने सोडवणारा काँग्रेसचा नगराध्यक्ष सभागृहात पाठवून हातकणंगलेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया असे आवाहन उपस्थितांना आमदार पाटील यांनी केले.

 यावेळी राज्य सरकारच्या फसव्या आश्वासनाला कोणीही बळी पडणार नाही आज ज्या घोषणा होत आहेत त्या फक्त निवडणुकीसाठी होत आहेत प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती सरकारची झाली आहे नगराध्यक्षसह नगरसेवक बहुमताने निवडून येतील असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.



Post a Comment

Previous Post Next Post