हे सर्व महाराष्ट्राची जनता बघून घेत आहे -आमदार सतेज पाटील

Kolhapur : 


पहिल्यांदाच कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गृह मंत्रालय फेल गेलं असल्याची सडकून टीका माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केली. छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीवरूनही पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली असून सतेज पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं काम सुरू आहे. सर्व इतिहासकारांनी सांगितलं त्यांचा इतिहास कच्चा असल्याचे सांगितलं आहे. इतिहासाचे अनेक दाखले पाहिल्यानंतर खरा इतिहास लोकांसमोर आला आहे. 


त्यांना राज्याबद्दलचे इतकं प्रेम आहे की उद्योग घेऊन जात आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचं काम सुद्धा घेतल असून हे सर्व महाराष्ट्राची जनता बघून घेत असल्याची टीका सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

Post a Comment

Previous Post Next Post