कोल्हापूर - कर्ज मागण्याचा बहाना करून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची मोपेड लंपास करून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला राजारामपुरी पोलिसांनी अटक केलीय. अमर शंकर भोसले असं आरोपीचे नाव असून त्याच्या जवळून चोरीच्या मोटरसायकलसह 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजारामपुरी येथील खाजगी फायनान्स कंपनीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे राहणारे परेश बाळासो पिसे हे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. 27 नोव्हेंबर 2024 रोजी राजारामपुरी सातवी गल्ली येथे कर्ज मागण्याच्या बहाण्याने सांगली जिल्ह्यातील कवठे पिरान इथला संशयित आरोपी अमर शंकर भोसले हा पिसे यांना भेटला. यावेळी स्वतःची गाडी पंचर झाल्याचं खोटं सांगून त्याने पिसे यांची ज्युपिटर मोपेड लंपास केली. दरम्यान या प्रकरणी परेश पिसे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास सुरू असताना काल आरोपी अमर भोसले याला अटक करण्यात आलीय. राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या कडून चोरलेली मोपेड व मोबाईल असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलीय.
Post a Comment