प्रतिनिधी - किशोर जासूद
खापणेवाडी -वि.मं. खापणेवाडी येथे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत डॉ. चंद्रकुमार नलगे फाऊंडेशनच्या संस्थापिका व रयत क्रांती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अनिता नलगे यांनी समाजोपयोगी कार्य राबवले. यामध्ये गावातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या तसेच महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
या प्रसंगी सौ. अनिता नलगे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शनही केले.
कार्यक्रमाला विभव प्रदीप नलगे, सुनिल खोत, जयश्री पिल्ले, दिपा कांबळे, वि.मं. खापणेवाडी शा.व्य. समिती अध्यक्ष श्री. बाळासो खापणे, माजी अध्यक्ष श्री. प्रकाश गुरव, उपाध्यक्ष श्री. सखाराम खापणे, श्री. विलास खापणे, श्री. तानाजी देसाई, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मेटकर सर व सौ. बसवंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप नाळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अजित चव्हाण यांनी केले.
ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती.
Post a Comment