सांगली : ( प्रतिनिधी - विजय क्षेत्रे )
अपंग सेवा केंद्र, सांगली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नव्या खुल्या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. या मंडपाचे नामकरण “कै. गंगाधर ना. कुलकर्णी स्मरणार्थ” सौ. शोभा अचल कुलकर्णी यांच्या सौजन्याने करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ तसेच पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. मंडपाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. सौ. शोभा अचल कुलकर्णी यांच्या दानातून उभारलेला हा मंडप दिव्यांगांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार ल मोतीलाल परिक यांनी, तर आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार सुयश पाटील यांनी केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अचल कुलकर्णी व सौ. शोभा अचल कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्या कमलताई कुलकर्णी यांच्या दानातून एका दिव्यांगाला इलेक्ट्रिकल व्हीलचेअर देण्यात आली.कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील यांचा गौरव आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाला. “ही खरी मानव प्रयोगशाळा आहे. येथे काहीही कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी दिव्यांग मुलांचा सत्कार डॉ. सौ. माधवी पटवर्धन यांनी केला, तर सत्काराचे निवेदन नितांजली कुलकर्णी यांनी केले. योगशिक्षिका मनीषा काळे यांनी पाहुण्यांचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्ष एम. एम. कुलकर्णी, सचिव सौ. पुष्पाताई काशीकर, श्रीनिवास जोशी, अनुप हळदीकर आदी उपस्थित होते.
संस्थेचा परिचय सौ. श्रुती वेलणकर यांनी करून दिला. नृत्य व नाटिका या सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. याचे दिग्दर्शन कार्यकर्त्या सौ. तृप्ती हेगडे व सौ. राधा संकपाळ यांनी केले. सूत्रसंचालन अध्यक्षा श्रीमती निर्मला कुलकर्णी यांनी केले, तर खजिनदार रमेश राठोड यांनी आभार मानले.
Post a Comment