कोल्हापूर: प्रतिनिधी राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक परिसरात केलेल्या कारवाईत विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. प्रथमेश यशवंत पाटील, राहणार कोल्हापूर.असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजारामपुरी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सायबर चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. तपासादरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा सापडला.
या कारवाईचं मार्गदर्शन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलं असून, पोलीस उपनिरीक्षक सतीश चंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.या पथकात अमोल पाटील, कृष्णात पाटील, सचिन पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर आणि सुशांत तळप यांचा सहभाग होता.
Post a Comment